सावज - 1 - THE HUNT - मराठी भयकथा - marathi horror stories

सावज - 1 - THE HUNT - मराठी भयकथा - marathi horror stories 

MARATHI HORROR STORIES
 MARATHI HORROR STORIES











                              

      निरभ्र आकाश ,दुपारची वेळ , आकाशात उंच भरारी घेणारी घार ! ती जरी उंचावर होती तरी तिचं लक्ष जमिनीवर होतं . नजर जमिनीवर होती . सावज शोधत होती .  

         आणि  ती क्षणार्धात खाली झेपावली . व आपल्या दणकट पंजात तिने शिकार उचलली . वर नेली व वरून सोडली . तो ससा आपला जीव वाचला म्हणून आनंदात होता . पण क्षणार्धात तो दगडावर आपटला . घार खाली आली . त्याला उचललं व पुन्हा आकाशात उंच उडाली . आपल्या घरट्याच्या दिशेने . पिलांच्या दिशेने . कोणाचा जीव ? कोणाचं भक्ष ? कोणाचं भोजन बनलं होतं !

     हे जग असंच आहे , ' बळी तो कान पिळी ' हि जुनी म्हण खोटी नाही . तुमच्या जवळ ताकद हवी पैशाची ! सत्तेची ! लोकांची ! शारीरिक व मानसिक ! कोणतीही ! पण ते बळ असणं गरजेचं आहे . ते जर नसेल तर आपली रोज शिकार होत राहते . आपला रोज बळी जातो . आपण रोजचं मरण जगतो . व ते आपल्या इतके अंगवळणी पडते की तेच आपलं आयुष्य होऊन जातं ! 

     त्यात, जर ती स्त्री असेल , मुलगी असेल ,सुंदर असेल , हुशार असेल बोलणारी असेल ,हसतमुख असेल , स्मार्ट असेल , मॉडर्न असेल , तर ? ..... 

   ती अशीच होती ! ती रश्मी होती . जसं नांव तशीच कांती ! रेशमासारखी मुलायम ,सॉफ्ट स्किन ,नेहमी हसत राहणारी , बोलघेवडी , स्वतःच्या सौन्दर्याचा गर्व नसणारी ! कॉलेज मध्ये शिकणारी ,मित्र परिवार मोठा ! मैत्रिणी पण चांगल्या होत्या . त्या गप्पा मारत होत्या . तेवढ्यात रश्मी आली . सगळ्यांचा चेहेरा प्रफुल्लित झाला . रश्मी सर्वांची लाडकी होती . ' सेंटर ऑफ द टेबल '. क्षणात लीड तिच्याकडे आला . 

   तिने विचारलं ," आज काय विशेष ? " "कुठेतरी पिकनिक ला जायचंय !" "पण कुठे जावं ते कळत नाहीये .तेच डिस्कस करतोय . " " त्यात काय डिस्कस करायचंय ? जवळच एक किल्ला आहे तिथे जाऊया .संध्याकाळी रिटर्न !"

  " पण जाणार कसं ? " "आपल्या  TWO WHILER  ने जाऊ . " "नको .त्यापेक्षा आपण माझ्या पप्पांच्या कार ने जाऊ ! पप्पाना आज सुट्टीच असते . " निधी म्हणाली . "पण ,ड्राईव्ह कोण करणार ? " "ऑफ कोर्स मीच !" रश्मी ,निधी ,गार्गी ,प्रिया व कार्तिकी ! निधीच्या घरी पोहोचले . तिचे बाबा घरीच होते . त्यांनी सर्वांचं स्वागत केलं. गप्पा  मारत मारत विषय निघाला . " पप्पा , आम्हाला पिकनिक ला जायचंय . आपली कार घेऊन जायचेय !" निधी म्हणाली .

     " पण जाताय कुठे ? "  " किल्ल्यावर ! " निधी म्हणाली . ते ऐकताच पप्पांचा चेहेरा गंभीर झाला . ते मुलींच्या लक्षात आलं . " अंकल , काय झालं ? " रश्मीने विचारलं . "किल्ल्यावर नका जाऊ ! तिथलं वातावरण चांगलं नाही ." " म्हणजे ? " "काही नाही ! " नका जाऊ !" एवढं बोलून ते निघून गेले . 

     मुलींचा मूड गेला . उगीच यांना सांगितलं असं झालं . त्या निघाल्या . निधीचा निरोप घेतला . "निधी , आम्ही जातो . " निधीला कसंतरी वाटलं . ती म्हणाली , "एक मिनिट ,मी पप्पांशी बोलते . " एवढं बोलून ती मध्ये पळाली . काही वेळात निधी व तिचे पप्पा सागर बाहेर आले . निधीच्या चेहेऱ्यावर आनंद होता . ती म्हणाली ," आपण किल्ल्यावर जातोय ,पप्पा सोबत येतायेत . पण तुमची हरकत नसली तर !" मुलींचा चेहेरा खुलला . " थँक्यू अंकल ,आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही . " " चला तर मग !" सागर ने म्हटलं . 

   काही वेळात तयारी करून साधन सामग्री घेऊन ,खाण्या - पिण्याच्या जिन्नस घेऊन सर्वजण निघाले . " तुझी मम्मी असती तर तिला पण नेलं असतं ." सागर म्हणाला , "आंटी कुठं गेल्या आहेत ? " गार्गी ने विचारलं . " मम्मी मामाकडे गेलीय . उद्या - परवा येईल . " निधीने उत्तर दिलं . 

    "आपल्याला निघायला उशीर झालाय ! यायला रात्र होईल ,तुम्ही घरी सांगितलंय का ? " चौघीनी घरी फोन लावले . निधीचे पप्पा सोबत आहेत म्हटल्यावर घरच्यांना टेन्शन नव्हतं . त्यांनी  होकार दिला . 

     काही वेळात मजा - मस्ती करत सर्वजण  किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचले . किल्ला भव्य होता .उंच होता ,शिवाय उंचावर होता . पाहूनच छाती दडपत होती . सागरने मुलींना पुन्हा बजावलं ,"मी तुम्हाला पुन्हा सांगतो ,ऐका माझं ,थोडं  फिरा ,खाणं -पिणं उरका ,व परत फिरा . " मुलींनी एकमेकींकडे बघितलं ,निधीच म्हणाली " पप्पा ,आम्ही जास्त फिरणार नाही , संध्याकाळी परत निघू ,चालेल ना ?"

    सागर चा नाईलाज झाला . " ठीक आहे. पण एकट्या कुठे ही फिरू नका ,सोबत राहा . फिरून झालं की  जेवणाचं बघा ,थोडा आराम करा ,व लगेच निघा ! नीट जा !" " म्हणजे अंकल तुम्ही येत नाही आमच्या सोबत ?" "नाही ! मी आलो असतो पण मग तुम्हाला एन्जॉय करता येणार नाही ,म्हणून मी खालीच थांबतो ! " "पप्पा प्लिज ,चला ना ! " निधी ने सागर ला विनंती केली . " सागर ने सर्वांकडे बघितलं , " तुम्हाला चालेल ? "  " हो ! का नाही ? " मुलींनी  सहमती दर्शवली . 

    सागरचं लक्ष सारखं रश्मीकडे जात होतं . का ते त्यालाही कळत नव्हतं . इतकी सुंदर मुलगी त्याने आयुष्यात बघितली नव्हती . त्यात तिचा निगर्वी पणा ! स्वतःहून बोलायची सवय ,तो प्रभावित झाला होता . सर्वजण किल्ल्याच्या दिशेने जाऊ लागले . वर चढता चढता खाली येणारे लोक भेटत होते . बोलता बोलता गार्गी ,प्रिया व कार्तिकी यांचा ग्रुप पुढे निघाला . आणि सागर ,रश्मी व निधी यांचा ग्रुप थोडा मागे राहिला . 

   रश्मी व निधी गप्पा मारत जात होत्या व सागर निधीकडे पाहत चालत होता . रश्मीला या गोष्टींची सवय झाली होती ,तिला आपल्या सौंदर्याची जाणीव होती ,आणि पुरुषी स्वभावाची ओळख होती . ती दुर्लक्ष करत राहिली व सागर शी अधून मधून बोलत ही राहिली . तिने काही विचारलं तर सागर भरभरून बोलायचा . किती बोलू किती नाही असं व्हायचं त्याला ! आता ही  तोच बोलत होता ,तितक्यात गार्गीने निधीला आवाज दिला . निधी तिकडे पळाली ,बोलता बोलता ते सर्व जण बरेच वर आले होते . त्यांना इथल्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडली होती. व सागर ला रश्मी ची ! रश्मी अवती भवती चं निसर्ग सौंदर्य पाहत होती व सागर तिचं  सौंदर्य डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न करीत होता . 

   काही वेळात ते किल्ल्यावर पोहोचले . थंडगार सावलीत सर्व थकवा निघून गेला . थोडा वेळ फिरल्यानंतर त्यांनी जेवण उरकली , व मनसोक्त गप्पा मारल्या . पुन्हा फिरायला निघाल्या ,निघताना ग्रुप मधेच निघाल्या . पण त्या पाच ही जणी नकळत पणे डिव्हाइड होत गेल्या . पण फिरण्याच्या नादात त्यांना काही कळालं नाही . सूर्य आता मावळती कडे झुकला होता . रश्मी खूप आत शिरली होती ,व तिथे दिवसा ही  अंधार होता , सर्व खोल्या एक सारख्या दिसत होत्या . 

    बाहेर पडायचा नेमका रस्ता कोणता ते तिला कळत नव्हतं . ती थोडी घाबरली होती ,मैत्रिणींना आवाज देत राहिली ! हातात पर्स होती ,मोबाईल पर्स मध्ये ठेवला . असाही इथे मोबाईलचा काही उपयोग नव्हता . 

  इकडे संध्याकाळ झाली तशी ,एकमेकींना शोधत शोधत निधी ,गार्गी,प्रिया व कार्तिकी एकत्र आल्या . पण रश्मी सापडत नव्हती . म्हणून त्यांनी निधीच्या पप्पाना आवाज दिला . ते जिथे बसले होते तिथे पोहोचल्या . सागर त्यांचीच वाट पाहत होता . 

    "बरं झालं ,तुम्ही आलात ! चला निघूया ! संध्याकाळ झालीय ! " "पप्पा ,रश्मी सापडत नाहीय ! " निधीने घाबरून सांगितलं , सागर चा जीव कासावीस झाला ! "काय निधी हा निष्काळजी पणा ? तरी मी तुम्हाला सांगितलं होतं कि सोबत राहा ,एकटं कुणीही फिरू नका म्हणून !" " आता तिला कुठे आणि कसं शोधणार ?" 

     तो पर्यंत किल्ल्यावरची बरीच मंडळी निघून गेली होती . दोन -तीन माणसं होती ,पण त्यांना सांगावं कि नाही ते सागर ला कळत नव्हतं . ते मदत करतील कि गैर फायदा घेतील ते समजत नव्हतं . पण सांगण्याची वेळच आली नाही , यांचं बोलणं त्यांनी ऐकलं होतं  व ते  स्वतः यांच्या जवळ आले . 

    "काय साहेब ? तरण्या - ताठ्या पोरींना घेऊन संध्याकाळचं फिरताय ! काही कमी जास्त झालं मग ?" सागरला ही ते पटलं होतं . तो पण नाही म्हणाला होता पण निधीने त्याला भरीस घातलं होतं . व त्याचा नाईलाज झाला होता . आणि सर्वांसमोर तिला काही बोलणं त्याला योग्य वाटलं नाही . 

    निधी रडकुंडीला आली होती , " पप्पा आता काय करायचं ? " " तरी बेटा मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की  थोडं ऐका म्हणून ! पण तुम्ही आजकालची पोरं ऐकाल तर शपथ !" " अंकल पण आता रश्मी ला कुठे शोधायचं ? " गार्गी ने भीत भीत विचारलं . सागर काय बोलणार ? उत्तर तर त्याच्याकडे  ही नव्हतं !..... 

                          

                                           TO BE CONTINUED ..... 

ENJOY WITH OUR MUSIC CHANNEL 'MUSICAL RAITA ' ALSO               

➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤








 

Previous
Next Post »