ससा ,कोल्हा आणि कासव - KIDS ENTERTAINMENT

                       ससा ,कोल्हा आणि कासव  - KIDS ENTERTAINMENT

KIDS ENTERTAINMENT
 KIDS STORIES

    मित्रांनो ,नमस्कार ,  

 मी  योगेश बोरसे तुमचं BGSM मध्ये म्हणजे BORSE GROUP'S SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो . आज तुमच्या साठी घेऊन आलो आहे एक अशी गोष्ट जी तुम्हाला नक्कीच रंजक वाटेल.

         मित्रांनो, ससा आणि कासवाच्या गोष्टीमध्ये ससा शर्यत हरतो व कासव जिंकतो हे आपल्याला माहित आहेच . जेव्हा कासव शर्यत जिंकतो तेव्हा ससा त्याचं अभिनंदन करतो . आणि म्हणतो ,मी झोपलो होतो म्हणून तू जिंकलास नाही तर मी जिंकलो असतो .

     कासव म्हणतो "ठीक आहे , आपण एक काम करूया, कि आता इथून जो सर्वात पहिले नदी पलीकडे जाईल तो शर्यत जिंकला .चालेल ?" आता हे सशाला पटतं ,व तो विचार न करताच पळत सुटतो आणि नदीकिनारी जाऊन थांबतो . आणि विचारात पडतो 'अरेच्च्या ,आपल्याला तर पोहोताच येत नाही . आणि तेवढ्या वेळात कासव हळू हळू येतो नदी मध्ये उतरतो .नदी पलीकडे जातो आणि शर्यत जिंकतो . 

   ससा त्याला म्हणतो ,"तू मला परत फसवलस !" "कसं काय ?" " कारण तुला माहीत आहे, मी पोहू शकत नाही. " कासव विचारतो, " मग आता आपण काय करायचं ? तूच सांग आता ! " " आपण एक काम करूया, आपण एक जज नेमूया. " सश्याला युक्ती सुचते. " जो आपला न्यायनिवाडा करेल. " ते कासवाला मान्य होतं. त्याचवेळी तिथून एक कोल्हा जात असतो. 

       ससा कोल्ह्याला बोलावतो, " कोल्हेदादा जरा ऐकता का ? " " काय ससोबा काय म्हणताय ? " तुम्ही आमचा न्यायनिवाडा करा ! हा कासव मला दर वेळेस फसवून हरवतो. आता मला जिंकायचा ! पहिल्यांदा मी झोपलो म्हणून हरलो व दुसऱ्यांदा मला पोहोता येत नाही म्हणून हरलो. " ससा म्हणाला. 

     कोल्ह्याने धूर्तपणाने विचारले, " मग आता काय विचार आहे ? " " तुम्हीच सांगा ! " ससा भोळेपणाने म्हणतो. " ठीक आहे ! " कोल्हा गालातल्या गालात हसतो. मी पुढे जाऊन एका झाडापाशी थांबतो. जो माझ्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचेल तो जिंकला. " असं म्हणून कोल्हा पुढे जाऊन एका झाडाजवळ थांबतो.  सशाला आनंद होतो,  " आता मीच जिंकणार ! आता काय करशील ? " " पळ तर खरं ! " कासव म्हणाला. व एक दोन तीन म्हणताच ससा धूम पळत सुटतो. कोल्हा त्याची वाटच पाहत असतो. 

      ससा झाडापर्यंत पोहोचताच कोल्हा सश्यावर झडप घालतो आणि त्याला खाऊन टाकतो. हे दुरून येणारं कासव बघतो व लगेच आपला मार्ग बदलतो. कासव मनात म्हणतो, ' मित्रा मला हरवण्याच्या नादात तू स्वतः चा जीव गमावला. काय मिळवलंस ! ' व कासव तिथून काढता पाय घेतो. 

     मित्रांनो, बरेच लोकं स्वतः चा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी काहीही  करायला तयार असतात. त्यात स्वतः चं नुकसान करून घेतात. व शहाणी माणसं त्या पासून धडा घेऊन आपला मार्ग निवडतात. वेळप्रसंगी बदलतात आणि पुढे जातात.काही लोकं संधी साधू असतात ,कोल्ह्यासारखी ! ते प्रसंगी दुसऱ्याचं नुकसान करून स्वतः चा स्वार्थ साधतात .  

    मित्रांनो सशाचं आयुष्य कमी असतं. तो नाजूक असतो, भित्रा असतो, चपळ असतो. 

त्या उलट कासव जास्त जगतं, धावपळ कमी करतं, शांत राहातं  ! 

कधी कधी शांत राहणंही आपलं आयुष्य वाढवतं ! 

   बघा जमतं का ! तो पर्यंत, 

                                TAKE CARE YOURSELF !  

 VISIT OUR YOU TUBE CHANNEL  

    लेखक : योगेश वसंत बोरसे . 


➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤



       

Previous
Next Post »