पिसाट - मराठी भय कथा - MARATHI HORROR STORY
मराठी भय कथा |
लेखक : योगेश वसंत बोरसे.
"तुमचं बरंय ! झाडाला लटकलेले राहता,रात्री अपरात्री फिरता !" गंगाराम झाडाकडे वर शेंड्याकडे पाहून बोलत होता . वेळ संध्याकाळची होती ,आणि झाड मोठं होतं . वर वटवाघूळ उलटी लटकलेली होती . येणारे जाणारे गंगारांकडे पाहायचे व हसायचे . त्यांना वाटायचं की हा वटवाघळांशी गप्पा मारतो . बावळट !
पण , तसं नव्हतं . तो गप्पा मारायचा ते कोणाला दिसत नव्हते . झाडावर अजून कुणी होतं , अजून काही होतं , जे गंगारामच्या परिचयाचं होतं . गंगाराम झाडाच्या पारावर बूड टेकून बसला ,वर पाहत राहिला . बडबड करत राहिला . बघता बघता रात्र झाली . गंगारामला झोप लागली . झाडावर जे काही होतं ते खाली आलं . व गंगाराम कडे पाहू लागलं . "गंगाराम उठ ! आपल्याला जायचंय !"
गंगाराम उठून बसला . " ए , अरे झोपू दे ना ." गंगाराम म्हणाला . "तू भुताड आहेस , रात्रीचा फिरतोस . पण मी अजून जिवंत आहे . आणि एवढ्या लवकर मला तुझ्या सारखं झाडाला लटकायचं नाही ! "
त्याचं बोलणं ऐकून भुताड हसायला लागलं. " ए ,गप ! कशाला दात काढतोय ?" कारण तुला माझं काम करायचं आहे . " भुताड म्हणालं ."मला काय फायदा ? " "तुला काय फायदा ? अरे रोज माझ्यामुळे मजा मारतोस ! तरी विचारतोय काय फायदा ? " "अरे मजा मारतं ते माझं शरीर असतं . आत्मा तुझा असतो . मला काहीच समजत नाही ,मी काय करतो ते !" "अरे पण शरीर तर तृप्त असतं ना ! "भुताड म्हणालं .
गंगारामला उत्तर सुचलं नाही . तसे बाकीचे आत्मे त्यांची मजा पाहत होते . " बरं ,तयार आहेस का ? " "नाही ! आज इच्छा नाही ! " "तू असा ऐकायचा नाहीस . " असं म्हणून भुताड त्याच्या शरीरात शिरलं . आता गंगाराम गंगाराम राहिला नव्हता . त्याच्या अंगात त्या भुताडाने प्रवेश केला होता . जे ' पिसाट ' होतं ,' लिंग पिसाट ' !
ऐन तारुण्यात मेल्याने त्याच्या वासना अतृप्त राहिल्या होत्या . तसाही तो जिवंत असतानाही पिसाटच होता . नांव जीवन होतं ,पण इतरांसाठी विशेषतः आजूबाजूच्या ,सभोवतालच्या तरुणींसाठी तो कर्दनकाळ होता . अवघ्या तिसाव्या वर्षी मेला होता . पण जोपर्यंत जगला , असंख्य तरुणींना भोगलं होतं .
आणि ,त्यातल्याच एकीने सूड उगवला ,व याला यमसदनी धाडला . धारदार हत्याराने याचा अंत केला . आणि नंतर स्वतःला संपवलं ! बरं ! तिने जे केलं ते अतृप्त अवस्थेत असताना केलं . व त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला . दोघांचे आत्मे अतृप्त अवस्थेत भटकत होते . याला माध्यम मिळालं होतं . शिवाय याची इच्छाशक्ती तीव्र होती . त्यामुळे जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही ,तृप्ती मिळत नाही , हा भटकत राहायचा .
गंगारामच्या शरीराचा आश्रय घेऊन व ती पाहत राहायची ,फांदीवर बसून कधी झोका घेत . तृप्ती शरीराची महत्वाची कि आत्म्याची हा विषय आता गौण होता . कोणतं बंधन नव्हतं . ना वेळेचं ! ना समाजाचं ! ना नैतिकतेचं ! जी शिक्षा व्हायची ती वापरल्या जाणाऱ्या शरीरांना व्हायची . हा मोकळा पिसाटा सारखा . झालं, स्वारी निघाली . म्हणजे गंगाराम निघाला व सोबत त्याच्या शरीरात प्रवेश केलेला जीवनही . रात्र वाढत गेली . तसे रस्ते सामसूम झाले . याचा शोध सुरु झाला , सावज शोधायचा , एवढ्या मोठ्या शहरात अवघड नव्हतं . तितक्यात जीवनला चाहूल लागली . आपल्या मागं कुणी आल्याची ! त्याने मागे बघितलं . जिने त्याचं जीवन संपवलं होतं , ती मागे मागे आली होती. बोलण्याची गरज पडली नाही.
आज तिने पुढाकार घेतला , ती जयंती होती , ऐन तारुण्यात इज्जतीला संभाळण्याकरता स्वत:च बलिदान दिलं होतं व समोरच्याला संपवलं होतं . पण इज्जत , इभ्रत , सर्व काही जिवंत असे पर्यंत ,मेल्यावर काय ? आत्मा व शरीर सोबत असले कि आत्म्यावर बंधने येतात , नैतिकतेची , जग काय म्हणेल याची, सामाजिक प्रतिष्ठा जपण्याची ! पण आता तसं काही नव्हतं , म्हणून आज तिने पुढाकार घेतला . ते भटकत भटकत एका जागी येऊन थांबले . समोर एक जुना बांगला होता . काही वेळात एक कार करकरत बंगल्याजवळ येऊन थांबली .
एक सुंदर तरुणी कार मधून खाली उतरली व जीवनचे डोळे विस्फारले . एवढं अप्रतिम लावण्य तो प्रथमच पाहत होता . ती पुढे गेली व बंगल्याचं गेट उघडलं , परत कार मध्ये बसली व कार मध्ये नेली . याचा अर्थ एकच ! सेक्युरिटी नव्हता . तसा जीवनही मागे मागे शिरला . तिने गेट बंद केलं आणि बंगल्यात प्रवेश करण्यासाठी वळाली , हीच वेळ योग्य समजून जयंतीने तिच्या शरीरात प्रवेश केला . तिच्या मादक शरीराला झटका बसला . डोकं जड झालं .पण काही तरी हवं हवंसं वाटत होतं ,जे आज मिळणार होतं . त्याच उन्मादात ती बंगल्यात प्रवेशली . व मागे मागे जीवन उर्फ गंगाराम !
बंगल्यात तिच्याशिवाय कुणी नव्हतं . जीवनने तिच्या मागे दार बंद केलं . तशी ती दचकली . पण जीवन कडे पाहिलं आणि डोळ्यातील भाव बदलले . शरीर नाही म्हणत होतं , पण आत्मा त्याला ओढ लागली होती . तिलाही कळेना , 'आज नेमकं असं काय होतंय ? अन हा आहे कोण ? सरळ घरात आला !'
' आणि आपण याला बाहेर घालवण्याऐवजी यालाच आमंत्रण देतोय ?' विचार येत गेले . पण पावलं बेडरूम कडे वळाली . दोघांनी मधे प्रवेश केला . व बेडरूमचं दार बंद झालं . काही वेळाने त्या बंगल्यातून आर्त किंकाळ्या ऐकू आल्या . व दोन आत्म्याचे समाधानी हुंकार बंगल्यात घुमू लागले .
त्यांचा कार्यभाग उरकला . आत्मे तृप्त झाले होते . शरीरं कॉटवर विसावली , व हे दोन्ही आत्मे समाधानाचे हुंकार भरत बाहेर पडले . आपल्या झाडावर आले , व फांद्यांवर विसावले . आणि गंगाराम तो निपचित पडला होता . शरीर सुखावलं होतं . पण आत्मा ? तो दुखावला होता . आपण जे करतोय ते योग्य नाही ,याची जाणीव त्याला खात होती .
त्याने शेजारी पसरलेल्या अप्रतिम सौंदर्याकडे बघितलं ! डोळे भरून बघितलं ! ती सुखासीन निद्रेत विसावली होती . गंगाराम अलगद उठला . कपडे घातले , हळूच बाहेर पडला . बाहेरचा दरवाजा बंद केला .
आपल्या मुक्कामावर आला ! ते जणू त्याचीच वाट पाहत पाहत होते . हा आला आणि एकच गलका सुरु झाला .
" तुझं बराय ! रोज मजा मारून येतोस !" आणि हास्याचा आवाज आसमंतात दुमदुमला !गंगारामला नेमकं कळत नव्हतं ,आपल्याला आनंद वाटतोय कि दुःख होतंय ? पण नजरेसमोर ते अप्रतिम लावण्य सारखं येत होतं !आणि मनाला त्याची ओढ लागली होती !....
THE END
VISIT OUR YOU TUBE CHANNEL
लेखक :योगेश वसंत बोरसे .
- ALL RIGHTS RESERVED AT YOGESH BORSE &BGSM
- ABOUT US
- PRIVACY POLICY
⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎ ⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎
ConversionConversion EmoticonEmoticon