आज - उद्या - मराठी कविता- MARATHI POEMS

आज - उद्या..... MARATHI KAVITA SANGRAH 

MARATHI KAWITA SANGRH
 मराठी  कविता 

  कवी : राज  योगेश बोरसे


अनेकदा मज विचार येतो , उत्तर आज मज मिळेल का ?
माणूस प्राणी श्रेष्ठ असुनि, जीव उद्याच्या मुठीत का ?
अशाच कडव्या नात्यांमधली , गोड़ी पुन्हा फुटेल का ?
मानुस प्राणी स्वतंत्र असूनी , भविष्य उद्याच्या मुठीत  का?
इथेच आहे तिथेच आहे , फसव्या आशा सत्य होतील का?
स्वप्नांमधूनी भविष्य रंगवी ,सत्य उद्याच्या मुठित का ?
स्वप्न पाहिले ,मार्ग आखिले ,किती बरोबर किती चुकीचे कळेल का ?
प्रयत्न आजचे ,दिवस रात्रीचे , मग फळ उद्याच्या मुठित का ?
अनेकदा मज  येतो ,असेच का अन तसेच का ?
सर्व उद्याच्या मुठीत आहे , मग उद्या आजच्या कवेत का ?
असेल उद्या हा  गृहीतांवरती ,पण आज आतावर निर्भर का ?
सर्व उद्याच्या मुठीत आहे ,मग उद्या आजच्या कवेत का ?


                                        ⇎⇎⇎⇎⇎⇎⇎⇎
VISIT OUR YOU TUBE CHANNEL ALSO


➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤                                                 ➤➤➤➤➤➤➤