बाळंतीण - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

                                    बाळंतीण - मराठी भयकथा - MARATHI HORROR STORY

 HORROR STORY MARATHI
MARATHI HORROR STORY 
 अनुभव :- श्री . अरुण पाटील 

 लेखक आणि शब्द संकलन :- श्री . योगेश बोरसे . 

         चाकण ,एक प्रसिद्ध गांव ! अगदी इतिहास काळापासूनच ! मग तो चाकणचा किल्ला असो किंवा अलीकडील वाढती MIDC ! MIDC म्हटलं की कंपन्या आल्या. कंपनी म्हटलं की शिफ्ट आल्या. फर्स्ट, सेकंड व नाईट. मला नाटकाचं भारी वेड. स्वतः लेखक असल्याने प्रश्नच नव्हता. कंपनीतील काही कर्मचारी हाताशी धरून कंपनीच्या कॉन्फरन्स हॉल मध्ये रंगीत तालीम चालायची, अर्थात प्रॅक्टिस चालायची . म्हणजे कंपनीच्या परवानगीनेच! जसा वेळ मिळेल तसा ! 

         सेकंड शिफ्ट रात्री बारा वाजता सुटायची, त्यानंतर १ - २ तास प्रॅक्टिस केली की आम्ही निघायचो. बाईक प्रत्येकाजवळ असल्याने प्रश्नच नव्हता. तशा कंपनीच्या बस होत्या, पण प्रॅक्टिस महत्त्वाची. ज्यांना आवड होती, नाटकांची ओढ होती असेच कर्मचारी निवडले होते. लेखनापासून ते दिग्दर्शनापर्यंत सर्व काम माझ्याकडे होतं. 

           त्यादिवशीही तेच झालं ! रात्री बारा वाजता शिफ्ट संपली. नाईटचे कामगार त्यांच्या कामाला लागले आणि आम्ही कॉन्फरन्स हॉलमध्ये जमलो. कंपनीच्या गेट - टुगेदर च्या वेळेस नाटक सादर करायचं होतं. व तो दिवस जवळ आला होता. प्रॅक्टिस अंतिम टप्प्यात आली होती. बघता बघता रात्रीचे दोन कधी वाजले कळालच नाही. 

        जसं लक्षात आलं तसे एकएक जण निघायला लागले. सर्व जवाबदारी माझी असल्याने नेमका मी शेवटी राहायचो. त्या रात्रीही राहायलो ! रस्ता सर्वांचाच परिचयाचा असल्याने, गाडीखालचा असल्याने गाड्या भराभर निघाल्या. मला एकाने आवाज दिला. " चल, आम्ही निघतो ! " म्हणून मी सांगितलं, " तुम्ही जा, मला अजून पाच एक मिनिटं लागतील. " " नक्की जाऊ ? " " हो ! बिनधास्त जा !  " त्यांनी जास्त विचार केला नाही व मी ही नाही. (Read more - Marathi Bhaykatha / Marathi Horror Story ) 

         काहीवेळात मी कॉन्फरन्स हॉल लॉक करून बाहेर आलो. बाईक काढली. नकळतपणे नजर घड्याळावर गेली. 2 : 45 ! ' माय गॉड ! इतका उशीर झाला ? ' रात्रीची वेळ, सुमसाम रस्ता! मी अगदी आरामात बाईक चालवत होतो. सिगरेटची लहर आली पण म्हटलं पुढे चौफुलीवर गेल्यावर पीत बसू. तिथं रात्रीची ही वर्दळ असते ! इथं पीत बसलो तर एखादा आपल्याला पाहून घाबरायचा ! 

       चेहेऱ्यावर थोडं हसू आलं. आजूबाजूला पाहत शिळ घालत आरामात चाललो होतो आणि एकाबाजूला नजर स्थिरावली तशी शिळ आपोआप बंद झाली. ' Something wrong here ! ' रात्रीच्या मिट्ट अंधारात जवळजवळ तीन वाजता ! कुणी बाई, सोबत लहान मुलाला घेऊन, अशी अंधारात असेल ? काही संकटात तर नसेल ? म्हणून मी स्पीड कमी करत करत बाईक थांबवली. नजर हटत नव्हती त्या स्त्रीवरून. लाल जर्द साडी, मोकळे केस, रंग साधारण गव्हाळी असावा . 

        माझं लक्ष तिच्याकडे, तिचं माझ्याकडे ! नजर हटत नव्हती. नजरेत काहीतरी विलक्षण होतं जे समजण्यापलीकडचं होतं. मोठेमोठे डोळे, भेदक नजर ! मणक्यातून थंडगार सणक गेली ! वरून खालपर्यंत घाम फुटला ! शरीराच्या सिक्स सेन्स ने काम केलं असावं. धोका !..... गाडी सुसाट निघाली ती सरळ चौफुलीच्या पान टपरीवर येऊन थांबली. अंगाची थरथर चालू होती जी मलाही कळत नव्हती. नकळतपणे हात थरथरत पँटच्या खिशात गेला. सिगारेटचं पाकीट काढलं. थरथरत्या हातांनी सिगरेट काढली पण पेटवता येईल तर शपथ ! 

         माझ्या त्या हालचालींवर टपरीवाल्याचं लक्ष होतं, " साहेब काय झालं ? " तो मला साहेब म्हणायचा त्यामुळे मी घाबरलोय, हे सांगायला जीभ धजत नव्हती. पण देहबोली असतेच आणि त्याला समजलंच ! त्याने न राहवून विचारलं, "  मग घाबरलात का बरं ? " याला काय सांगणार ? " साहेब एक सांगू ? असं रात्रीचं एकटं फिरत जाऊ नका ! एकतर आज अमावस्या आहे ! " " अमावस्या ? " कोणतीही तिथी न मानणारा मी अमावस्या ऐकल्याने केवढा दचकलो. 

       " साहेब, तुम्ही येता त्या रस्त्याला, अमावस्येला एक बाई दिसते. हातात लहान मूल असतं. आतापर्यंत भरपूर लोकं घाबरलेत ! मला वाटलं तुम्हालाही दिसली असेल ! " म्हणजे बाई फिरते  ते याला माहीत  होतं ! मी शांतपणे गाडीला किक मारली. निघता निघता त्याला विचारलं, " बाईला पाहून कुणी घाबरतं का ? " " साहेब ती ओली बाळंतीण होती ! तशातच मेली ! तिचं पोरगं पण मेलं होतं ! " " काय ? " मी केवढ्याने उडालो. 

         " मेलेली बाई फिरेल कशी काय ? " मी काय केलं मलाच कळालं नाही. मी पुन्हा त्या रस्त्याकडे वळलो, जिथे ती दिसली होती तिथपर्यंत आलो, तिथे बघितलं, आजूबाजूला बघितलं, कुणीही नव्हतं  आणि डोकं पुन्हा काम करायला लागलं. ' आपण पुन्हा इथे काय करतोय की आपल्याला ही वेध लागले वर जाण्याचे ? ' आता काही दिसलं नाही पण त्या स्त्रीची नजर पाठलाग करत होती. 

( Read more - Marathi Bhaykatha / Marathi Horror Story )

          कुणीतरी  एकटक आपल्याकडे बघतय,असं वाटत होतं. आणि कुणीतरी आपल्या सोबत आहे असंही वाटत राहिलं !त्याच विचारात घरी कधी पोहोचलो कळालं ही नाही. नंतर काही दिवस तापाने फणफणलो. रंगीत तालीम जागेवर राहिली. नाटक जागेवर राहीलं  पण ती नजर...  अजूनही पाठलाग सोडत नाही......  

 

                                                   -:  THE END  :- 


     मराठी भयकथा, एकांत, हवाहवासा वाटणारा, त्यात जर सोबतीला आपली प्रिय व्यक्ती असेल तर ? पण तिच गोष्ट आपल्या अंगाशी आली तर काय होऊ शकते, याची रोमहर्षक व भयचकीत करणारी ही कथा .अवश्य वाचा. धन्यवाद.

     for more products and books please visit our e -store or click on the link https://www.borsegroup.tech/p/store-buy-now-httpsimojo.html . 



 

WATCH MUSICAL COVER SONGS ON OUR YOU TUBE CHANNEL 'MUSICAL RAITA '

         





                            💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀💀


Previous
Next Post »