भीती - मराठी भयकथा - DEAR TO FEAR - marathi horror story

                     भीती - मराठी भयकथा - DEAR TO FEAR - marathi horror story

MARATHI HORROR STORIES
 मराठी भयकथा 

                                          लेखक : योगेश वसंत बोरसे. 

     Fear - भीती - डर - भय - घबराहट !    

    हे असे शब्द ज्यांचं प्रत्येकाशी नातं असतं. कुणी मान्य करतं कुणी करत नाही. कृपया ही कथा  पूर्ण वाचा , मगच सांगा, तुम्ही घाबरता की नाही !

    भीती, भय प्रत्येकाला वाटत असते ,फक्त स्वरूप वेगवेगळे असते, जे  बऱ्याचदा आपल्या लक्षातही येत नाही किंवा आपण लक्ष देत नाही. जीव अस्वस्थ होणे, जीव घाबरा होणे ही 

 सुद्धा अनामिक भीतीची अवस्था आहे. काही तरी असे घडण्याची भीती जी आपल्याला नको आहे ,तरीपण आपल्यासोबत घडेल अशी भीती ! 

     कुणाला अंधाराची भीती, कुणाला एकटेपणाची, कुणाला एकटे पडण्याची भीती, कुणाला आई - वडिलांची, कुणाला बायकोची भीती, विद्यार्थ्यांना परीक्षेत नापास होण्याची भीती, कुणाला नोकरी जाण्याची तर कुणाला धंदयामध्ये नुकसान होण्याची भीती, अस्वस्थता, असुरक्षितपणा, इन्सिक्युअर फिलिंग ! 

      शेतकऱ्यांना दुष्काळाची तर कधी अतिवृष्टीची भीती ! कधी अवेळी येणाऱ्या पावसाची तर कधी बाजारभाव कोसळण्याची भीती ! सावकारांना, बँकांना कर्ज बुडण्याची भीती ! तर सत्ताधीशांना सत्ता जाण्याची भीती ! 

        हरण्याची भीती, मरणाची भीती, अपमानाची भीती, असेल तर भीती नसेल तरी भय. पैसा असला तरी भीती, नसला तरी भीती !

        याचाच अर्थ माणूस जन्मतः आपल्या सोबत भीती घेऊन येतो व मरेपर्यंत घाबरत राहतो आणि बऱ्याच लोकांना घाबरायला आवडते त्यासाठी ते धाडस करतात कधी निभावून जाते तर कधी अंगाशी येते, आपत्ती आणते. 

        असाच मी पण एक, म्हटलं तर भित्रा, म्हटलं तर धाडसी, कारण भयकथा, भयपट ज्याला आपण हॉरर म्हणतो तो पाहण्याची व वाचण्याची आवड असलेला, तुमच्यातलाच एक ! 

   
   अशीच एक रात्र पूर्ण पावसाची , ढगांनी भरलेली. दाट काळोख. कदाचित अमावस्या असावी. माझी सेकंड शिफ्ट होती. म्हणजे रात्री १२ वाजता शिफ्ट सुटायची, डयुटी संपायची. रात्रपाळीचा पार्टनर आला की नाही हे पाहून घ्यायचे मगच सुट्टी व्हायची.  म्हणजे १५ ते २० मिनिटं सहज निघून जायचे, तोपर्यंत बरोबरीचे कामगार निघून जात व MIDC तील रहदारी बरीचशी कमी होऊन जायची. 

       नेहमीचे असल्याने काही वाटायचे नाही पण कधी कधी आपण चुकीच्या वेळी, चुकीच्या जागी असलो तर नको ते घडते. त्या दिवशीही तेच झाले. कंपनीतून निघत निघत जरा जास्तच उशीर झाला. कंपनी गेटच्या बाहेर आलो. दोन्ही बाजूच्या रस्त्याकडे नजर टाकली. 

       जवळपास निर्मनुष्य रस्ते. आता रिक्षाही मिळणार नाही ! मनात विचार आला, ' आता पायपिट करावी लागणार ! ' 

      वातावरण पावसाने भरलेलं, अधून मधून विजांचा कडकडाट. मधेच एखादी प्रकाशाची तिरीप चमकून जायची परत गडद अंधार. अंधार - अरे लाईट गेली वाटतं ! दुष्काळात तेरावा महिना ! सर्वीकडे शांतता, अंधारलेलं वातावरण, रहस्यमय, म्हणजे जसे आपल्याला आवडते तसे रोमांचित करणारे ! अंगावर शहारे आणणारे !

       तसा देवभक्तच. तसाच अज्ञात शक्तींवर ही विश्वास !  माहित नाही पण आपण जर मान्य केलं तर तीव्रता कमी होते म्हणून विश्वास असेल कदाचित, किंवा रात्रीशी, अंधाराशी सख्य असल्याने त्याला साथ मिळत असावी. 

     आता घरीच जायचे होते त्यामुळे काही घाई नव्हती. पण वातावरणातील बदल म्हणा, किंवा एकटेपणा म्हणा, अंगावर शहारे येत होते. रमत गमत गाणी म्हणत रस्त्याने चाललो होतो. आता आपलेच राज्य अशी  कल्पना मनाला त्याही अवस्थेत सुखावणारी होती. 

      आमच्या कंपनीपासून जवळपासच्या तीन - चार कंपन्या बंद अवस्थेत होत्या. तिथली जागा अज्ञात शक्तींनी भरलेली आहे, अशी चर्चा होती. आणि नेमकं यावेळी नको ते विचार डोक्यात आले, यायला लागले. विचारांच्या नादात लक्ष शेजारील बंद कंपनीच्या आवाराकडे गेलं. शांतता, कुठेही काहीही हालचाल नाही. 

       मग म्हटलं, " हे...... लोकं काहीही बोलतात. लेकाचे. दाट झाडी, किर्र अंधार, मोठे मोठे वटवृक्ष.  अंधारात लक्ष गेलं एका हालचालीकडे आणि मनाने कौल दिला, काहीतरी वेगळं असण्याचा. डोक्यापासून खालच्या मणक्यापर्यंत एक थंडगार सणक गेली. 

                                     SOMTHING WRONG HEAR ! 

      आता पावलांचा वेग वाढला होता. श्वासांचा वेग वाढला होता. तो इतका वाढला की पाहणाऱ्याला वाटेल, हा चालतोय की पळतोय ? 

     
 आणि तेवढ्यात मागून आवाज आला, " पाहुणे काय झालं ? " मी दचकून मागे बघितलं. एक वयस्कर व्यक्ती माझ्या मागून येत होती. सफेद कुर्ता, सफेद धोतर नेसलेली. धोतर की पायजमा ? जाऊ दे, आपल्याला काय ! 

      जीवात जीव आला, एक से भले दो. क्षणभरच थांबलो होतो परत सुरु. त्यांना रस्त्याने या पूर्वी कधी पाहिलं नव्हतं म्हणून विचारलं. तर ते म्हणाले, " पाहुणे माझा हाच रस्ता आणि ह्योच टाइम हाय, तुमचाच टाइम आज चुकला ! " " म्हणजे ? " मी म्हटलं. ते म्हटले, " जाऊ द्या पन एक सांगा, तुमि पळताय कशा पायी ? " " आं ! "

   
  तेव्हा लक्षात आलं, अरे आपण तर पळतोय आपल्याला माहीत नाही ! आणि हे चालतायेत ते पण आपल्याबरोबर, कसं काय ? एवढी वयस्कर व्यक्ती कसे...... काय ?....... आणि पुढचं  कळायला शुद्धचं राहिली नाही.

       काही वेळाने  शुद्धीवर आलो . किती वेळ गेला माहित नाही. पण तिथं मी एकटाच होतो. ती व्यक्ती , ते जे काही होतं तिथं नव्हतं !

     मित्रांनो तुम्हाला दिसलं तर नक्की सांगा. तोपर्यंत, 

                                   TAKE CARE AT NIGHT !
                                           HAVE A GOOD EVERY NIGHT ! 

                                           THE END

 VISIT OUR YOU TUBE CHANNEL                                   

                    लेखक : योगेश वसंत बोरसे.        





 ⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭                                            ⧭⧭⧭⧭⧭   






 

Previous
Next Post »