एक होता विचार :- motivational speech

                     एक होता विचार - Motivational Speech     


MOTIVATIONAL THOUGHTS
 BEST MOTIVATION

VISIT OUR YOU TUBE CHANNEL ALSO

                                                 विचार आणि लेखन :- योगेश वसंत बोरसे. 

      'श्रावण बाळ !' भारतीय संस्कृतीचा शिरोमणी. प्रत्येक आई बापाला अभिमान  वाटावा असा मुलगा ! ज्याने शेवटच्या क्षणापर्यंत आई - वडिलांची सेवा केली. आपलं भाग्य थोर म्हणून आपण अशा भूमीत जन्मलो. 

       श्रावण बाळ आपल्या आई - वडिलांना , अंध आई - वडिलांना ज्यांची चालण्याची - फिरण्याची क्षमता नव्हती त्यांना कावडीत बसवून काशी यात्रेला जात होता. तहान लागलेली. रात्रीची वेळ. जंगलातील रस्ता, निरव शांतता. त्या शांततेत पाण्याची खळखळ ऐकली आणि श्रावण आनंदला. आता आपल्याला आपल्या आई - वडिलांची तहान भागवता येईल. व इथे थोडी विश्रांती घेता येईल. या विचाराने श्रावणाने कावडी एका झाडाखाली ठेवली व आई - वडिलांना तिथेच थांबायला सांगून तो पाणवठ्याकडे पळाला. 

       श्रावणाने कमंडलू पाण्यात बुडवला व बुडबुड आवाज येताच एक बाण सूं सूं करत आला व त्याने श्रावण बाळाचा वेध घेतला. श्रावण बाळाला बाण लागल्याचं दुःख नव्हतं पण आता आपल्या आई - वडिलांना कोण सांभाळणार ? त्यांना पाणी कोण पाजणार ? त्यांची सेवा कोण करणार ? हाच विचार मरतांनाही त्याच्या मनात होता. 

       आणि आपला मुलगा बाण लागून मेला हे समजल्यावर प्राणांतिक वेदना होऊन श्रावण बाळाच्या आई - वडिलांनीही जीव सोडला. धन्य तो श्रावण बाळ आणि धन्य ते आई - वडील ! 

     पण माझा प्रश्न हाच आहे की प्रत्येकाला वाटतं माझ्या मुलाने माझी श्रावण बाळासारखी सेवा करावी. पण मला सांगा असे किती आईबाप आहेत जे श्रावण बाळाच्या आई-वडिलांसारखे पुत्र शोकाने मेले ? एक ही नाही. मग आपलीच योग्यता नसतांना आपण आपल्या मुलांकडून अपेक्षा का करावी ? आपली योग्यता नक्कीच नाही. अगदी माझी ही नाही. 

     आपण नेहमी म्हणतो जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळायला हवं. पण माफ करा आपण अजूनही ते मुलांना देऊ शकलो नाही जे श्रावणाच्या आई - वडिलांनी त्याला दिलं. पण प्रश्न उरतोच कि असं काय दिल असेल जे आपण देत नाही, आजपर्यंत देऊ शकलो नाही. पण याचा कुणाला विचारचं करायचा नाही. करावासा वाटत नाही. अहो साधी  गरज ही वाटत नाही. 

      आपण मुलांच्या गरजा, अनावश्यक गरजा पूर्ण करतो व पुढे त्यांना जमलं, शक्य  झालं तर ते आपल्या गरजा पूर्ण करतात. म्हणजे निव्वळ व्यवहार. खरं सांगू, आपण प्रेम, कुटुंबाचं प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, आपुलकी, आपलेपणा घालवून बसलोय. आपण कुणाला हवेहवेसे वाटत नाही तर आपण घरातल्यांनाच नकोनकोसे होऊन जातो. मग हा फरक का ? 

       आपल्या मुलांना एवढं सक्षम बनवा कि जे त्यांना हवं असेल अर्थात जे योग्य असेल ते त्यांना मिळवता यावं. सजीव प्रेमाचे भुकेले असतात. त्यांना ते जिकडे मिळतं ते तिकडेच वळतात. मुळात आपल्यातलं प्रेम संपत चाललंय. संपून गेलय, त्याची जागा स्पर्धेने, इर्षेने, तिरस्काराने घेतलीय. मग मुलं तरी दुसरं काय करणार ? आपण म्हणतो जग बदललं, जग बदललं. शेवटी जग म्हणजे तरी काय, आपणंच.

       आपणंच बदललोय. म्हणून जग बदललेलं दिसतंय. म्हणून आपल्याला पुन्हा बदलण्याची गरज आहे. पण त्यासाठी मरणं गरजेचं नाही. तर श्रावण बाळाचे आई - वडील जसे पुत्रशोकाने मेले तसे पुन्हा कुणी मरणार नाहीत यासाठी प्रयत्न केला तरी पुरेसा आहे. 

         कुणाचा मुलगा होऊन राहता आलं सेवा करता आली तर नक्की करा. असं म्हणतात कि प्रत्येकात एक लहान मूल असतं. ते जिवंत ठेवणं गरजेचं असतं. आपल्यातलं लहान मुलंच हरवलंय. आपल्यामध्ये अजूनही कुठे ना कुठे प्रत्येकात श्रावण बाळ आहे. फक्त आपण त्याला दडपून टाकलय. भौतिक इच्छांच्या लालसेने. त्याला असं संपवू नका. 

          त्याला बाहेर येऊ दया. बघा, तुम्ही पण सर्वांना हवेहवेसे वाटाल. काही चुकीचं वाटलं तर मोठ्या मनाने माफ करा. आणि जर काही बरोबर वाटलं तर नक्की कळवा तोपर्यंत,

                                      जय श्री राम !

                                                  लेखक :योगेश वसंत बोरसे .      




➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣➣                                                 ➣➣➣➣➣➣➣➣➣➣






⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭⧭











   

Previous
Next Post »