सावज - THE HUNT - PART - 4 - MARATHI BHAYKATHA - HORROR STORY

सावज - THE HUNT - PART - 4 - MARATHI BHAYKATHA  - HORROR STORY 


MARATHI HORROR STORIES
 MARATHI HORROR STORY



        रश्मीच्या एक लक्षात आलं होतं , आपण अजून आपल्याच कॅरेक्टर मध्ये  वावरत आहोत .रश्मीपण कॅरेक्टर मधेच आहे . पण ती आपल्याला ओळखत नाही . कार्तिकी व गार्गी स्वतःला  श्यामल व केतकी समजतात . राहिली प्रिया ! निधीला दचकल्या सारखं झालं . 'प्रिया कुठेय ?' तिचं लक्ष अभावित पणे राणी सरकारच्या मागे गेलं . प्रिया राणी सरकारला पंख्याने हवा घालत होती. आता ही कोण आहे काय माहीत ! तेवढ्यात राणीसरकारचा आवाज आला., " कुसुम.... " " जी राणी सरकार. " प्रियाच्या शरीरातील कुसुम म्हणाली.  " पाहुण्यांची व्यवस्था माझ्या जवळच्या कक्षात करायची   ! या दोघींना काही कमी पडणार नाही हे बघ ! " 

  निधी अर्थ लावत राहिली. ' इथली प्रत्येक व्यक्ती जिवंत आहे, फक्त वेगळ्या कॅरेक्टेरमध्ये दिसत आहे. याचा अर्थ राणी सरकार पण कुणीतरी असणारच ! म्हणजे शरीर दुसरं कुणाचं ? व आत्मा  दुसऱ्याचा ! आत्मा ? म्हणजे आपल्या मैत्रिणींवर दुसऱ्या आत्म्यांनी कब्जा केलाय ? मग आपल्यावर का नाही ? रश्मीवर का नाही ? '

  तिच्या मनातील विचार राणीसरकारने ओळखले असावेत. " जास्त डोकं वापरू नकोस. अजून लहान आहेस. " त्या निधीकडे पाहून म्हणाल्या, " तू माझ्या कक्षात ये. मला बोलायचंय तुझ्याशी." राणीसरकार तेवढ बोलून निघून गेल्या. रश्मी काही न बोलता उठली तिने निधीकडे पाहिलं ही नाही व निघून गेली. 

  निधीच्या मागे केतकी व श्यामल उभ्या होत्या, त्या कुजबुजत होत्या पण मोठया आवाजात. निधीला ऐकू जाईल असं, " हीचा  बाप मगाशी मेला आणि ही मस्त मेजवानी झोडतेय. " " खाऊ दे ! तिचा शेवटचा दिवस आहे ! म्हणजे शेवटची रात्र ! ती सकाळपर्यंत काही राहत नाही ! " 

  निधीच्या छातीत धस्स झालं. ' याचा अर्थ आपण आता मरणार ! मग यातून बाहेर कसं पडणार ? ' ती डोकं धरून बसली. केतकीने तिला हात लावून उठवलं, " राणी सरकारने बोलावलंय . लवकर निघा. " व त्या दोघी तिच्या दोन्ही बाजूला येऊन उभ्या राहिल्या. " चला ! " निधीचा नाईलाज झाला. ती उठली व चालू लागली. तिला राणीसरकारच्या कक्षात सोडून त्या दोघी निघून गेल्या. 

  राणी सरकार एका  जागी बसून काहीतरी मंत्र पुटपुटत होत्या. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले, " बस ! " निधीला आज्ञा केली. व तिला जवळ बसवून घेतलं. आणि तिच्या डोक्यावर हात ठेवला. निधीला पहिले काही जाणवलं नाही पण हळूहळू तिच्यातील शक्ती क्षीण होत गेली, तिला ग्लानी यायला लागली ,  केसांचा रंग बदलायला लागला. शरीराची स्किन लूज पडायला लागलं, डोळ्यांची, कानांची शक्ती क्षीण होत गेली ! 

            काही वेळापूर्वी तरणीताठी असलेली निधी आता एका  वृद्ध स्त्री मध्ये रूपांतरित झाली होती .  अत्यंत वृद्ध स्त्री आणि राणी सरकारचं तेज प्रचंड वाढलं होतं. तरीही त्यांनी निधीच्या निधीच्या डोक्यावरील हात काढला नाही. 

  थोड्याच वेळात तिथे अस्थी पंजर दिसायला लागलं !  तरीही राणी सरकारने हात काढला नाही. काही वेळात तिथे काहीही उरलं नाही. निधीला राणी सरकारने पूर्ण नष्ट केलं होतं. अगदी कणभर ही सुटलं नव्हतं. तिच्यातील पूर्ण शक्ती, पूर्ण तेज त्यांनी ओढून घेतलं होतं. कार्तिकी, प्रिया व गार्गी दिसायला साधारण होत्या, निधी जरा चांगली होती, पण रश्मी सुंदर होती. मग तिला सोडून निधीचा  बळी का गेला ? हे त्यांच्या  समजण्या पलीकडचं होत. थोड्याच वेळात राणी सरकारने टाळी वाजवून इशारा केला. तशा तिघी जणी मध्ये आल्या. राणी सरकारचं  सौंदर्य द्विगुणित झालं होतं. त्या बघतच राहिल्या ! 

  " माझ्या स्नानाची तयारी करा. व रश्मीला बोलवा. " त्या खाली माना घालून गेल्या. थोड्याच वेळात रश्मी आली. राणी सरकार मंचकावर बसल्या होत्या. त्यांनी रश्मीला शेजारी बसवून घेतलं. त्यांची नजर तिच्या सर्वांगावरुन फिरली. रश्मीला कसतरीच वाटलं. शरीर स्त्रीच होतं पण बघणारी नजर पुरुषी वाटत होती .  ओळखीची वाटत होती. तिला समजेना हे कसं शक्य आहे ? 

  कारण निधीचे पप्पा मेले आहेत. हे तिला माहित नव्हतं. त्यांच्या डोळ्यातील अभिलाषा, भूक तिला राणी सरकारांच्या डोळ्यांत दिसली. एका स्त्री शरीराकडून दुसऱ्या स्त्री शरीराची अभिलाषा, भूक, इच्छा हे अनैसर्गिक होतं ! ती तिथून पटकन उठली  व कक्षाबाहेर जायला लागली. तिला मागून कुणीतरी हात धरून ओढलं . व्यक्ती ओळखीची होती. क्षणार्धात तिला उचलून घेतलं व मंचकावर नेलं, पलंगावर नेलं ! ती काहीही करू शकली नाही. 

 काही वेळाने  राणीसरकार स्नानाकरता गेल्या. त्यांचं मन व शरीर तृप्त झालं होतं. खूप वर्षांनी त्यांना दोन सावज मिळाले होते. ज्यांची त्यांनी सहज शिकार केली होती. एक भक्ष बनली होती ! तर एक भोग बनली होती ! जो पर्यंत रश्मीचं सौंदर्य असणार होतं ती रोज भोग बनणार होती व एक दिवस भक्ष बनणार होती. हे ठरलं होतं !

       सकाळ झाली, कार्तिकी, प्रिया व गार्गी तिघी झोपेतून जाग्या झाल्या. आपण कुठे आहोत, हेच त्यांना कळत नव्हतं. भिंती पण दगडी होत्या. याचा अर्थ आपण अजूनही किल्ल्यातच आहोत. दिवस उगवला आहे. सूर्य प्रकाश प्रखरपणे पडतोय. आपण एकमेकांना बघू शकतो याचा  अर्थ आपण जिवंत आहोत, वाचलो आहोत. आनंद मानावा कि दुःख ? त्यांना काळात नव्हतं. त्यांच्या समोर तीन व्यक्ती नाहीशा झाल्या होत्या व त्या काहीही करू शकल्या नव्हत्या. 

    तिघींनी एकमेकांकडे बघितलं सुटकेचा निश्वास टाकला व हात हातात घालून बाहेर पडल्या. त्यांचं साधारण दिसणं आज त्यांच्यासाठी वरदान ठरलं होतं ! त्यांचा जीव वाचला होता. त्यांना रश्मी आठवली ! तिचा सुंदर चेहेरा आठवला ! तिचं सौंदर्य तिच्यासाठी शापित ठरलं होतं !तिच्या सौंदर्याने तिची शिकार केली होती ! 

    आणि निधी ? ती तर बिचारी विनाकारण  भक्ष बनली होती. तिच्या वडिलांची नजर तिला भोवली होती.. ते ही संपले होते. शरीराने . व निधीही . तिघी तटबंदीजवळ येऊन थांबल्या . त्यांना कसली तरी चाहूल लागली. त्यांनी मागे वळून बघितलं, कुणी नव्हतं. त्या परत निघाल्या. 

     " मला सोबत नाही नेणार ? " आवाज रश्मीचा होता. घुमत होता. पण फक्त आवाज होता. ती कुठे दिसत नव्हती. " रश्मी..... " गार्गीने आवाज दिला पण रश्मीची सुटका होणार नव्हती. 

           सशासारखं घारीने तिला पंजात पकडलं होतं ! तीच जगणं व मरणं  त्या घारीच्या अर्थात राणी सरकारच्या हातात होतं व त्या आपलं सावज एवढं सहज सोडणार नव्हत्या. ते केवळ अशक्य होतं ! 

  शेकडो वर्ष त्यांनी आपलं अस्तित्व सांभाळलं होतं व पुढेही कसं सांभाळायचं याची त्यांना पूर्ण माहिती होती ! किल्ला त्यांचा होता. त्यातील शक्ती वाढवून त्यांनी तो अभेद्य केला होता. साधारण नजरांना तो फरक समजणार नव्हता.  समजत नव्हता. अशा गोष्टींवर कुणी विश्वास ठेवत नव्हतं व ठेवणार ही  नव्हतं ! त्यामुळे त्यांचं काम सोपं होत होतं. 

                  ' सावज ' आयते त्यांच्या तावडीत सापडत होते, सापडणार होते !............ 


                                            -: THE END :-




➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤➤






  






  

Previous
Next Post »